गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
53 हजारांचा मुद्देमाल जप्त : कुपवाड पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कुपवाड येथील वन विभाग कार्यालय ते दत्तनगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.
धोपल उर्फ डोक्या महिमान्या काळे (वय 25, रा. सावळी), कान्या शिवाजी पवार (वय 45, रा. कवलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक त्यांचा शोध घेत होते.
वन विभाग कार्यालय ते दत्तनगर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास दोघेजण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतल्यावर धोपल उर्फ डोक्या आणि कान्या याच्याकडे 53 हजार रुपयांचा 2.125 किलो गांजा सापडला. दोघांनाही अटक करून कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
