Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : खरा पंचनामा

वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरी उघडकीस आणली होती. आता या प्रकरणानंतर पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ही कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेश कौशिक यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत या फॅक्टरीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र ठाण्याच्या इतक्या जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

तसेच निलंबन काळात वनकोटी यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष येथे हजेरी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मुंबई पोलिसांच्या झोन 6 अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकताच पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर सुरू असलेल्या ड्रग्स फॅक्टरीवर छापा टाकला होता. या कारवाईत ६ किलो ६७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल असा सुमारे १४ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.