"फडणवीस, शिंदे, अजितदादा पक्के बनिया"
अहिल्यानगर : खरा पंचनामा
महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीसदृश पाऊस पाहायला मिळाला. या अतिवृष्टीमुळे विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत होते. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, तर घाट क्षेत्रांमध्ये भूस्खलन होण्याच्या घटना घडतात.
याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान होते. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडून तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एकाप्रकारे इंद्रदेवाने यंदा संकट पाठवले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमीन आणि शेतीचे नुकसान झाले. २४-२५ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून ३१३२ कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यातील १६३१ कोटी रुपये होते ते एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदींनी दिले आहे. महाराष्ट्र सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना मदत होईल. २२१५ कोटी रिलीफ फंड दिला. ज्यातून ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. १० हजार रुपये रोख आणि ३५ किलो धान्यही महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे. तसेच कर्जमाफीच्या वसूलीही रोखण्यास सांगितले आहे.
ही महाराष्ट्रातील जी त्रिमूर्ति आहेत यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापारीपेक्षा जास्त आहेत. मला पद्मश्री पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवलं आणि विचारले की भारत सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल, कालच त्या तिघांनी माझ्यासोबत चर्चा केली आहे. मी मोदींच्या वतीने त्या तिघांना आश्वस्त केलं आहे की महाराष्ट्र सरकाराने आम्हाला सविस्तर रिपोर्ट पाठवावा, मोदी जी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी थोडासाही उशीर करणार नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.