पोलीस ठाण्याच्या छतावर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील हडपसरमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून एका दारुड्याने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना आज सकाळी 11:20 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेला हा व्यक्ती अचानक पोलीस ठाण्याच्या छतावर उभा राहिला आरडाओरड करत गोंधळ घालू लागला. काही काळ तो वरून आरडाओरड व अपशब्दांचा भडिमार करत होता. या प्रकारामुळे ठाण्यात उपस्थित नागरिक आणि पोलीस अधिकारी हैराण झाले होते.
पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर काही पोलिसांनी वर जाऊन त्याला खाली आणले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत गुन्हेगार परिसरात दहशत माजवत होते, पण आता थेट पोलीस ठाण्यातच दारुड्यांचा राडा सुरू झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.