गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पाऊण तास चर्चा
शिर्डी : खरा पंचनामा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रविवारी (ता. 5 ऑक्टोबर) अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. शहा शनिवारी (ता. 4 ऑक्टोबर) रात्रीच शिर्डीत पोहोचले होते. त्यांनी शिर्डीतील पंचतारांकित हॉटेल सन अँड सनमध्ये मुक्काम केला.
शहा रात्री हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, बाबासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी पाऊण तास बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे या बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजित पवार यांच्याशी बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा केली. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शहांनी इतक्या वेळ चर्चा केली असेल. बंददाराआड चारही नेत्यांमध्ये ज्यातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांचे नियोजन, तिन्ही पक्षांमधील समन्वय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या भरीव मदतीच्या पॅकेजवर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आज शिर्डीच्या कार्यक्रमांमधून अमित शहा शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे पॅकेज जाहीर करणार का? मराठवाड्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.