'वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी'
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांसमोर सर्वच काढलं
मुंबई : खरा पंचनामा
निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिका-यांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांचा शिष्टमंडळात सहभाग आहे... विशेष म्हणजे मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही सहभागी झाले. दरम्यान राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनाही निमंत्रण दिलं होते. लोकशाही बळकट व्हावी, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य उद्देश असल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलंय. दरम्यान निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे बंधूंची युतीची चर्चा, कालचा ठाण्यातील एकत्र मोर्चा आणि आज पुन्हा एकत्र निवडणूक अधिका-यांची भेट यामुळे राज ठाकरेंच्या मविआतील एन्ट्रीबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत.
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? असा प्रश्न राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे. जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? असा प्रश्न राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला. व्हिव्हिपॅट मशीन लावा. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.