Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपचा बडा नेता अडचणीत, गुंड निलेश घायवळची ती क्लिप समोर

भाजपचा बडा नेता अडचणीत, गुंड निलेश घायवळची ती क्लिप समोर

पुणे : खरा पंचनामा

पुणे गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल होताच गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल असताना देखील त्याला पासपोर्ट कसा मिळाला? या प्रश्नाचं उत्तर अजूनही समोर आलेलं नाही, आता त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली जात असून, योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान सचिन घायवळ याला देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे सध्याचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारसभेत भाषण करतानाचा गुंड निलेश घायवळ याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाहीत, रोहित पवारसारखा आमदार आपल्याला नको, आपल्याला भूमिपूत्र पाहिजे, असं या व्हिडीओमध्ये घायवळ बोलताना दिसत आहे, दरम्यान आता या व्हिडीओमुळे शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, दुसरीकडे निलेश घायवळ याचा राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

ते जर आपल्या वडील धाराऱ्यांची, आपल्या शेतकरी बांधवांची काळजी घेत नसतील. ते जर त्यांचा मान सन्मान ठेवत नसतील, तर तुम्ही त्यांना दादा म्हणून नका, दादा कोणाला म्हणतात? घरातील जो कर्ता माणूस असतोना त्याला दादा म्हणतात. हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण तो आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींची किंमत करत नाही, असं घायवळ याने राम शिंदे यांच्या प्रचारसभेवेळी केलेल्या भाषणात म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ आता समोर आल्यानं राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.