Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"उच्च आसनावर बसलेल्या न्यायाधीशासम मोठ्या नेत्याच्या सूचनेनंतर शस्त्र परवान्याचा निर्णय"

"उच्च आसनावर बसलेल्या न्यायाधीशासम मोठ्या नेत्याच्या सूचनेनंतर शस्त्र परवान्याचा निर्णय"

मुंबई : खरा पंचनामा

पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी शस्र परवाना नाकारला होता. मात्र तरी सुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी शिवसेना ठाकरे गटाने हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शस्र परवाना प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे.

अनिल परब यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मागील दोन-अडीच वर्षांपासून योगेश कदम यांना टार्गेट केलं जात आहे. अनिल परब यांना योगेश कदम यांचा केवळ राजीनामा हवा आहे. त्यामुळे अनिल परब हे महाराष्ट्रात कदम कुटुंबीयांची बदनामी करणं, हा एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी अनिल परब हे ठाकरेंच्या सांगण्यावरून बोलत आहेत, असा दावा कदम यांनी केला.

शस्र परवान्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, मी योगेश कदमला विचारलं आहे. त्याने मला सांगितलं की, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने, विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, तो पण न्यायाधीशच आहे. योगेश कदमने सांगितलस तो न्यायाधीशच आहे, मला नवा घ्यायचं नाही. पण योगेश कदमने त्याचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल, म्हणून गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदमने निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. रामदास कदम यांनी विधिमंडळातील व्यक्तीचं नाव न घेण्यामुळे योगेश कदम यांना कोणी आदेश दिले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.