बनावट नोटा प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
रायगड : खरा पंचनामा
अलिबागमधील बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले होते. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून नेमका मृत्यू कशामुळे झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. तर नुकतेच गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी भुषण पतंगे याला अटक करत बनावट भारतीय नोटा आणि चलन तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते.
दरम्यान आरोपी भूषण पतंगे याला कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र भूषण याला आकडीचा आजार होता. यामुळे त्याला चा मुंबई येथील ]] रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता ७ ऑक्टोबर पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. यात दहा दिवसांच्या उपचारादरम्यान भूषण याचा मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्या प्रकरणी त्याला मागील महिन्यात रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यानंतर अलिबागमधील त्याच्या घरी १२ लाख रूपयांच्या बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठीची यंत्रणा, कागद त्याच्याकडे सापडले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.