Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मित्रानेच चिरला मित्राचा गळाविश्रामबागमधील बारमधील घटना : संशयित पसार

सांगलीत मित्रानेच चिरला मित्राचा गळा
विश्रामबागमधील बारमधील घटना : संशयित पसार

सांगली : खरा पंचनामा

शहरातील विश्रामबाग येथे दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच धारदार चाकूने मित्राचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. गुरुवारी रात्री  शंभरफुटी रस्त्यावरील एका बारमध्ये ही घटना घडली. 

निखील रवींद्र साबळे (वय 25, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर संशयित  प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. सांगली) हा दुचाकीवरून पसार झाला आहे. निखील साबळे विवाहित असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते. काही दिवसांपूर्वी तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. आई-वडिल, पत्नी व दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता. 

गुरुवारी रात्री सातच्या सुमारास दोघांनी कोपर्‍यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दातरे असलेला चाकू बाहेर काढला. निखील याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे अति रक्तस्त्राव होऊन निखिल जागीच मृत झाला.
खुनानंतर प्रसाद चाकू घटनास्थळीच टाकून दुचाकीवरून पसार झाला.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी तसेच विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी संशयिताच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.