तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेसह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भाने या बैठकीत चर्चा झाली.
जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम असल्याचं आजच्या बैठकीत पाहायला मिळालं. तसेच, बैठकीनंतर अनिल परब, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, नितीन सरदेसाई, प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष मिळून बोगस मतदार याद्या सकट घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विरोध करणार आहेत. राज्य निवडणूक आयोग जरी आपला कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर करत असेल, तरी जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत विरोधक निवडणुकांना विरोध करत राहतील अशी भूमिका आजच्या बैठकीतून घेण्यात आली आहे.
जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत. मोर्चाच्या दिवशी पुढील भूमिका सर्व महत्त्वाचे पक्षाचे नेते मांडणार आहेत. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत विविध पर्यायांवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे व इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
आम्ही 1 तारखेला सत्याचा मोर्चा काढत आहोत. सत्य लोकांना कळावं आणि असत्य लोकांना कळावं यासाठी मोर्चा काढत आहोत. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरूवात होईल, मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका गेटपर्यंत हा मोर्चा जाईल, अशी माहिती शिवसेना नेते तथा आमदार अनिल परब यांनी दिली. मतचोरी बाबत आंदोलन पार पडल्यानंतर आम्ही पुढील दिशा जाहीर करणार आहोत. मोर्चाला ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु, आजची पत्रकार परिषद फक्त नियोजन आढावा सांगणारी होती. शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. आम्ही ज्या मागण्या आयोगाकडे केल्या होत्या, त्याबाबत आम्ही मोर्चामध्ये बोलणार आहोत, असेही परब यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.