ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले आरोग्य साहित्य संमेलन उत्साहात
पुणे : खरा पंचनामा
पुणे येथे पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या संमेलनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. संजय ओक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, अभिनेते डॅा. गिरीश ओक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य साहित्य आढावा, चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, संगीत रजनी, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन आणि स्मरणिका प्रकाशन संपन्न झाले. कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांच्यासह २५ हजार पुणेकर नागरिकांची नामांकित डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध तसेच मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबीर यावेळी राबविले गेले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.