नाशिकमधील सहायक आयुक्तांची खांदेपालट
वाहतूक विभागाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे
नाशिक : खरा पंचनामा
शहरातील गुन्हेगारांवरती पकड मिळवत असताना आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहायक आयुक्तांची खांदेपालट करण्यात आली. वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तपदी अद्विता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
नाशिक रोड विभाग ४ सचिन बारी यांची अंबड विभागात, अंबड विभागाचे शेखर देशमुख यांची पंचवटी विभाग १ तर वाहतूक विभागाचे सुधाकर सुरडकर यांची सरकारवाडा विभाग २ पंचवटी विभाग १ च्या संगीता निकम यांची नाशिकरोड विभाग ४ मध्ये बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचा कार्यभार आता महिला अधिकाऱ्यांकडे असणार आहे. उपआयुक्त किथिरीका सी.एम. यांची वाहतूक विभागाच्या उपआयुक्त नियुक्ती केली आहे. - वाहतूक विभागात आता उपआयुक्त, सहायक आयुक्त, आणि तृप्ती सोनवणे वरिष्ठ निरीक्षक महिला अधिकारी असल्याने बेशिस्त वाहतुकीवर जरब निर्माण करण्याची जबाबदारी या महिला अधिकाऱ्यांवर असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.