शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी ईश्वर बबन कवडे (वय २७, रा. घोरपडी गाव) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांकडून प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
ऐन दिवाळीत शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी आंदोलन केले. जेथे हे नमाज पठण झाले त्या जागी गोमूत्र शिंपडण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिववंदना केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.