तासगावमधील सराईत गुन्हेगार वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
तासगाव पोलिसांचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडून मंजूर
सांगली : खरा पंचनामा
बेकायदेशिर जमाव जमवणे, रस्ता अडवुन सरकारी कामात अडथळा करणे, जबरदस्तीने हिसकावुन काढुन घेणे, अवैध हत्यार बाळगणे, शिवीगाळ करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तासगाव येथील सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांच्या प्रस्तावाला प्रांतधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. दिवाळी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
विनायक सुधीर गुरव (वय २९, रा. सिध्देश्वर कॉलनी, एमएसईबीच्या पाठीमागे, तासगाव) असे हद्दपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर योग्य ती प्रतिबंधात्मक कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
तासगाव पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार विनायक गुरव याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे, शरिराविरुध्दचे पाच गुन्हे दाखल आहेत. तासगाव शहरात बेकायदेशिर जमाव जमवणे, रस्ता अडवुन सरकारी कामात अडथळा करणे, जबरदस्तीने हिसकावुन काढुन घेणे, अवैध हत्यार बाळगणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, नुकसान करणे बेकायदेशिर दारु वाहतुक करणे असे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हेगाराच्या वास्तव्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात पोलीस प्रशासन हे व्यस्त असताना तासगाव शहरात व हद्दीत सार्वजनिक शांतता भंग होवुन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता असल्याने तासगाव पोलिसांनी त्याच्याविरुध्द उपविभागीय दंडाधिकारी तथा, प्रांत अधिकारी मिरज यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (अ) (ब) प्रमाणे हद्दपार करणेबाबत प्रस्ताव पाठविला होता. उपविभागीय दंडाधिकारी तथा, प्रांत अधिकारी मिरज यांनी या प्रस्तावाची सुनावणी घेऊन चौकशी केली. निर्णयाअंती त्यास सांगली जिल्हयातुन एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई व संबधित आरोपीविरुध्द प्रस्ताव तयार करण्याची कामगिरी तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, अभिजीत गायकवाड, अमित परीट, सागर मगदुम, अमर सुर्यवंशी, प्रशांत चव्हाण, सागर पाटील, विवेक यादव, विठ्ठल सानप, अमित पवार, अर्जुन मोरे यांनी पार पाडली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.