Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचे पत्र जिल्हा नियोजन कार्यालयात; प्रशासनात खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचे पत्र जिल्हा नियोजन कार्यालयात; प्रशासनात खळबळ

बीड : खरा पंचनामा

राज्यात शासकीय दस्तऐवजांच्या गैरवापरात वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहीचा वापर करून तयार केलेले एक बनावट पत्र बीड येथील जिल्हा नियोजन कार्यालयात देण्यात आले होते. या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील रहिवासी अशोक वाघमारे नावाच्या व्यक्तीविरुद्ध बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का वापरून पत्र सादर झाल्याने शासकीय कामातील गोपनीयता आणि विश्वासार्हता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, असाच प्रकार बीड जिल्ह्यात यापूर्वीही घडला होता. जुलै 2025 मध्ये, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट लेटरहेड वापरून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपये निधी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता.

बनावट सही आणि लेटरहेड वापरून फसवणूक करणारे गुन्हेगार आता थेट प्रशासकीय कामात हात घालत आहेत. दरम्यान, यात कोणत्या बड्या व्यक्तीचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.