'चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या 'त्या' व्यक्तीचा मोबाईल चेक करा, घायवळचे किती फोन, निरोप दादांना दिलेत...'
पुणे : खरा पंचनामा
परदेशात फरार झालेल्या गुंड नीलेश घायवळच्या प्रकरणाने पुण्यात पुन्हा चर्चेला ऊत दिला आहे. घायवळने पळ काढण्यापूर्वी पासपोर्टवरील नाव बदलल्याचा आरोप आहे. त्याच्या पलायनामागे कोणाचा राजकीय आश्रय आहे का, हा प्रश्न आता जोर धरत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की, कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत घायवळकडून थेट संदेश पोहोचत होते.
तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळ परदेशात फरार झाला आहे. घायवळला कोण मदत करतंय याप्रकरणी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो, त्याच्या सर्व मोबाईलची आणि नंबरची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला त्याने दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. घायवळ एकटा काही करू शकत नाही पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नेस्तानाबूत होईल. पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी ही पिलावळ वाढवली आहे त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी थेट चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे, दरम्यान धंगेकरांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.