देशाला लवकरच मिळणार नवे सरन्यायाधीश! प्रक्रियेला सुरुवात
नवी दिल्ली : खरा पंचनामा
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. यामुळे देशाला लवकरच नवे मुख्य न्यायाधीश मिळणार आहेत. सरकारने पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश २४ नोव्हेंबरला पदभार स्वीकारतील. वृत्तसंस्थांच्या सूत्रांनुसार, विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यासाठी लवकरच विनंती पत्र सादर केले जाईल.
परंपरेनुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश, जे या पदासाठी योग्य मानले जातात, त्यांची नेमणूक भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून केली जाते. केंद्रीय कायदा मंत्री योग्य वेळी विद्यमान सरन्यायाधीशांकडून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्य नियुक्तीसाठी शिफारस मागवतात.
सध्याचे सरन्यायाधीश निवृत्त होण्याच्या (६५ वर्षे पूर्ण) सुमारे एक महिना आधी पुढील मुख्य न्यायाधीशांसाठी शिफारस पत्र पाठवले जाते. सद्यस्थितीत, मुख्य न्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद स्वीकारण्यासाठीच्या रांगेत आहेत.
नियुक्ती झाल्यास, न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबरला मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील आणि ते सुमारे १५ महिने (९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत) या पदावर राहण्याची अपेक्षा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.