Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : अखेर निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, अधीक्षक तुषार दोषी यांनी फलटणमध्ये ठाण मांडून फिरवली सूत्रे

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : अखेर निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक 
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, अधीक्षक तुषार दोषी यांनी फलटणमध्ये ठाण मांडून फिरवली सूत्रे

फलटण : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने याला अटक करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, साताऱ्याचे अधीक्षक तुषार दोषी, अपर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी फलटण येथे तीन तासाहून अधिक काळ ठाण मांडून सूत्रे हलवल्याने मदनेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शनिवारी पहाटे संशयित असलेला सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत बनकर पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्याला सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बनकरचं नाव स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्याच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आधारे त्याला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुढील तपासासाठी ४ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने फरार होता. घटनेचे गांभीर्य ओळखून महानिरीक्षक फुलारी, अधीक्षक दोषी, अपर अधीक्षक डॉ. कडुकर यांनी आज दुपारपासूनच फलटण पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. विविध तपास पथकांना सूचना देत त्यांनी वेगाने सूत्रे हलवल्याने गोपाळ बदने याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मृत डॉक्टरवर त्याने अनेकदा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत होती. फलटण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी बनकर हा डॉक्टर राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा असून, मृत्यूपूर्वी डॉक्टरने त्याच्याशी फोनवर संपर्क साधल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.