Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिरसाटांनी सिडकोची करोडोंची जमीन बिवलकरला दिल्याचा आरोपवनविभागानेच केलं कबूल

शिरसाटांनी सिडकोची करोडोंची जमीन बिवलकरला दिल्याचा आरोप
वनविभागानेच केलं कबूल

मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्यानं आरोप केलेल्या नवी मुंबईतील सिडको प्रकरणाला आता एक नवीन वळण प्राप्त झालं आहे. कारण खुद्द वन विभागाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून या प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मंत्री संजय सिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील यशवंत नारायण बिवलकर या व्यक्तीला करोडो रुपयांची जमीन दिल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केली होता. याप्रकरणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडे तब्बल १२ हजार पानांचे पुरावे देखील पाठवले होते. परंतु मागील २ महिन्यात याप्रकरणात कोणतीच कारवाई झालेली नव्हती.

रोहित पवार यांनी आरोप केलेल्या बिवलकर प्रकरणात तथ्य असून सिडकोची तब्बल १४०० कोटींची जमीन हडप केल्याची बाब खुद्द वनविभागानेच कबूल केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बिवलकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल आणि उरण पोलीस ठाण्याला वन विभागाच्यावतीने पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु आद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.

वनविभागाच्या पत्रात काय लिहिलंय?
पेन आणि उरण परिक्षेत्रातील आपटा, उलवे, सोनखार, तरघर, दापोली, कोपर, पारगांव डुंगी गावातील ६१ हजार ७५० चौ मी क्षेत्रफळाचे १२ भूखंड चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहेत.
नगरविकास विभागाच्या मदतीने सिडकोने या जमीनीचे वाटप केले आहे.
सदर जमीन वनविभागाची आहे मात्र कागदपत्रात फेरफार करण्यात आला आहे.
उरण परिक्षेत्रात १४०० कोटी, रसायनी परिसरात १४ कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन बळकावली आहे.
जमीन बळकावणारे बिवलकर आणि त्यांनी ज्यांना जमीन दिली त्यांच्यावर फसवणुकीचा तत्काळ गुन्हा दाखल करणे.

वनविभागाच्या पत्राची बाब समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संजय सिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत शिरसाट यांना विचारणा केली असता त्यांनी रोहित पवार बेछुट आरोप करत असून त्यांना देखील आता संजय राऊत यांच्यासारखी वायफळ बोलण्याची सवय लागली असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण लवकरच निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.

रोहित पवार यांनी संजय सिरसाठ यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा निशाणा साधताना वय पुढं करुन पळ काढू नका सरकारची ५ हजार कोटी रुपयांची जमीन खाजगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल आता सुट्टी नाही आशा आशयाचे ट्विट केलं आहे तर अंबादास दानवे यांनी देशासोबत गद्दारी करणाऱ्यांना कशाप्रकारे जमीन बक्षीस म्हणून सरकारने दिली हे समोर आणले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.