पतीचे तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध : जाब विचारल्याने पत्नीला संपवले
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीये. नवऱ्याचे तृतीयपंथीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे बायकोने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली.
सतत वाद सुरु असतानाच नवऱ्याने बायकोची कोयता आणि हातोड्याने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भादोले-कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत ही घटना घडलीये. रोहिणी प्रशांत पाटील (वय 28) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोहिणीचा पती प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलंय.
अधिकची माहिती अशी की, तृतीयपंथीयासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पती प्रशांत पाटील याने भादोले- कोरेगाव रस्त्यावर पत्नी रोहिणी पाटील हिची कोयत्याने आणि हातोडीने वार करून हत्या केली आहे. दरम्यान, त्यापूर्वी प्रशांतने पत्नीच्या डोळ्यात चटणी देखील टाकली होती. ही घटना घटना सोमवारी (दि. 29) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. तर रात्री नातेवाईकाने पती प्रशांत बरोबर या हत्या प्रकरणा आणखी काहीजण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, नातेवाईकांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, प्रशांत पाटील याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.