Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील तरुणाच्या खून प्रकरणी चौघाना लोणावळा येथून अटकखून प्रकरणात 17 जणांचा सहभाग, मोका अंतर्गत कारवाई करणार : उपाधीक्षक प्रणिल गिल्डा

मिरजेतील तरुणाच्या खून प्रकरणी चौघाना लोणावळा येथून अटक
खून प्रकरणात 17 जणांचा सहभाग, मोका अंतर्गत कारवाई करणार : उपाधीक्षक प्रणिल गिल्डा

मिरज : खरा पंचनामा

मिरजेतील निखिल कलगुटगी  या तरुणाच्या खून प्रकरणी चौघांना लोणावळा येथून अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात तब्बल 17 जण यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व संशयितांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली.
सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलकुटगी, सोहेल जमीर तांबोळी, विशाल बाजीराव शिरोळे,  (सर्व रा. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरजेत गणेश तलावजवळ दीड महिन्यापूर्वी पूर्व वैमनस्यातून  निखिल याचा धारदार कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी प्रथमेश ढेरे,  सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण (रा मिरज) यांच्यासह दोन अल्पवयीन अशा नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व चव्हाण हे चौघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्यावर अपहरण, खुनी हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी निखिल कलकुटगी याला धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी  निखिल याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून केला. निखिल हा शहरात जुगार क्लब चालवत होता. याप्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून प्रथमेश ढेरे, सर्फराज सय्यद प्रतीक चव्हाण,सूरज कोरे,गणेश कलगुटगी,संग्राम यादव व करण बुधनाळे यासह दोन अल्पवयीन अशा नऊ आरोपीना अटक केली. पोलिस तपासात निखिल कलकुटगी याच्या खुनाच्या कटात सलीम पठाण, चेतन कलकुटगी, सोहेल तांबोळी या तिघांचा ही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. खूनाच्या घटनेनंतर तिघेही पसार झाले. खुनात प्रत्यक्ष सहभाग असलेला विशाल शिरोळे हासुद्धा त्यांच्या सोबत पसार होता. गेले दीड महिने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. सलीम पठाण याच्यासह चौघे लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे जाऊन ताब्यात घेऊन मिरजेत आणले. चौघाना खून प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खून प्रकरणी आणखी चौघांची नावे निष्पन्न झाले असून ते फरारी असल्याचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.