शेंद्रेजवळ विदेशी बनावटीची दारू जप्त
कारसह 4.46 लाखांचा मुददेमाल हस्तगत : सातारा तालुका पोलीसांची कारवाई
सातारा : खरा पंचनामा
जिल्ह्यातील शेंद्रे येथे मारुती कारमधून विदेशी बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली. यावेळी कारमधून 97 हजारांची विदेशी बनावटीची दारू तसेच कार असा 4.46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातारा तालुका पोलीसांनी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडुकर यांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अशा व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले होते. हवालदार राजु शिखरे यांना गोपनिय माहिती मिळाली होती की शेंद्रे गावच्या हददीत काही इसम चारचाकी वाहनामध्ये बेकायदेशीररित्या विदेशी दारु वाहतुक करुन विक्री करता आणणार आहेत त्यानुसार पथक तयार करुन सापळा रचण्यात आला. शेद्रे येथे पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवेवर मारुती स्विफ्ट कार (एमएच 11 एके 2092) ही थांबवून गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
नंतर गाडीची दोन पंचासमक्ष तपासणी करुन 96 हजार 800 रु. किंमतीची विदेशी दारु व 3 लाख 50 हजार किंमतीची कार असा एकुण 4 लाख 46 हजार 800 रुपयांचा मुददेमाल जप्त करणेत आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद नेवसे, मनोज गायकवाड, राजु शिखरे, पंकज ढाणे, संदिप पांडव, दादा स्वामी, प्रदीप मोहिते यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.