अमृतसर येथील ऑल इंडिया कराटे स्पर्धेतील सांगलीतील विजेत्यांचा सत्कार
सांगली : खरा पंचनामा
अमृतसर येथे पंजाब कराटे असोसिएशनतर्फे आयोजित तिसरी ऑल इंडिया कराटे स्पर्धा दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सर्व राज्यातून एक हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता व विशेष प्रविण्यासह विध्यार्थ्यांनी यश संपादन केले. सांगली गावभाग मधील के. सी. के. कराटे अकॅडमी फाउंडर महेश भोकरे आणि प्रशिक्षक कपिल बावधनकार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धकांनी ३० सुवर्ण, ०८ रौप्य आणि ०४ कास्य पदके मिळवून त्यांनी यश संपादन केले आहे. या केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल सर्व विजेता स्पर्धकांचे भाजपा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्या हस्ते सर्व स्पर्धा विजेतांचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.