महाराष्ट्रातील या शहरात उद्यापासून 3 दिवस ड्राय डे
मुंबई : खरा पंचनामा
सध्या राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे.
परिणामी राज्यभरात निवडणुकीचं वातावरण आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील मतदानाच्या ठिकाणी ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना हे तीन दिवस मद्य खरेदी करता येणार नाही.
निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा /नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी / विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश आहे. काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (३ डिसेंबर) सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याची माहिती आहे.
कधी असेल ड्राय डे?
१ डिसेंबर - मतदानापूर्वीचा दिवस (आदल्या दिवशी)
२ डिसेंबर - मतदानाचा दिवस
३ डिसेंबर - मतमोजणीचा दिवस
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.