सांगलीत कर्मवीर पतसंस्थेमध्ये पतसंस्था संचालक सेवकांचे प्रशिक्षण उत्साहात
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थांसाठी सायबर सिक्युरिटी, महसुली कागदपत्रे, पतसंस्थांचे नविन कर्ज धोरण, नियामक मंडळाचे आर्थिक मापदंड या विषयावरील सखोल प्रशिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगलीच्या सभागृहात उत्साहात झाले.
या कार्यक्रमास अरुण काकडे विभागीय समन्वयक, एमसीडीसी, कोल्हापूर, कर्मवीर पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, व्हा. चेअरमन अॅड. एस.पी. मगदुम, संचालक रावसाहेब जिनगोंडा पाटील, ओ. के. चौगुले (नाना), जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, उपनिबंधक, मिरज बिपीन मोहिते, कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणास सांगली जिल्ह्यातून १०० पेक्षा जास्त नागरी ग्रामीण व नोकरदार पतसंस्थाचे पदाधिकारी व सेवक हजर होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. एम.ए. मुरुडकर, सहकार अधिकारी श्रेणी १. युसुफ शेख, सहाय्यक निबंधक, कोल्हापूर, बिपीन मोहिते उपनिबंधक, मिरज, सीए धीरज देशपांडे यांचे पतसंस्थासमोरील सध्याच्या अडचणी व त्यावरील उपाय या संदर्भात प्रशिक्षण झाले.
यावेळी एमसीडीचे समन्वयक अरुण काकडे, अॅड. एस. पी. मगदुम, अनिल श्रीपाल मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षण अधिकारी डी. एन. शास्ते, प्रविण फरांदे, ओमकार पुदाले, पुणे हे ही उपस्थित होते.
शेवटी शंका समाधान, उपस्थितांचे मनोगत झाले. प्रशिक्षणाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. झाली. कर्मवीर पतसंस्थेने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणाने या कार्यक्रमाची सांगता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.