आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 689 जणांची शस्त्रे जमा... निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस सज्ज
सातारा : खरा पंचनामा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सातारा पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून. जिल्ह्यात पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणुकीच्या कालावधीत परवाना असलेली पिस्तूल बंदूक काही शस्त्रे पोलिसांकडे जमा करावी लागतात. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून सुमारे 689 शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. अजूनही काहीजण शस्त्रे जमा करायचे बाकी आहेत संबंधितांना नोटीस बजावून शस्त्रे तातडीने जमा करण्याचे आवाहन सातारा पोलीस प्रशासनाकडूंन करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जिल्ह्यात 246 जणांकडे शस्त्रे परवाना आहे. यामध्ये काही जणांनी आपली शस्त्रे जमा केली आहेत.जे शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या कालावधीत सातारा पोलीस प्रशासनाकडूंन जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्त ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.