राज्यातील 7 पोलीस उपायुक्त/उपाधीक्षकांच्या बदल्या
संदीप भागवत सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 7 पोलीस उपायुक्त/ उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट तसेच कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली शहरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी संदीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सह सचिव भट यांच्या सहीने बदल्या करण्यात आलेले अधिकारी
खंडेराव अप्पा धरणे : पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नक्षल
नारायण जगताप : पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ते पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड
बापू विठ्ठल बांगर : पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
कार्यासन अधिकारी सावंत यांच्या सहीने बदली करण्यात आलेले अधिकारी
संदीप किसनराव भागवत : सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर
अशोक लालसिंह राजपूत : सहायक पोलीस आयुक्त, ठाणे ते सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
अशोक बापू शेळके : नागपूर सहायक पोलीस आयक्त. ते पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
शालिनी संजय शर्मा : सहायक पोलीस आयुक्त, नागपूर ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.