Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण : माजी मंत्री केसरकरांच्या अडचणी वाढणार

रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण : माजी मंत्री केसरकरांच्या अडचणी वाढणार

मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतल्या पवई परिसरामध्ये गुरुवारी (ता.30) दुपारी राज्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. रोहित आर्य या व्यक्तिने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 लहान मुलांसह दोन प्रौढांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोहित आर्यचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

माजी मंत्री व शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी रोहित आर्यबाबत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी रोहित आर्यला आपण स्वतः चेकने पैसे दिल्याचा खुलासा केला होता. आता याचबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लवकरच माजी मंत्री केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांना घटनेच्या दिवशी पोलिसांनी फोन करून रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र, केसरकर यांनी त्यावेळी रोहित आर्यशी संवाद साधण्यास असहमती दर्शवली होती. पण त्यांनी केलेल्या दोन कोटींच्या दाव्यामुळे आता ते या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आणि घटनेपूर्वी काय संवाद झाला होता, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिस आता केसरकर यांचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत.

दीपक केसरकर यांनी रोहित आर्यबाबतच्या एन्काउंटरनंतर मोठा खुलासा केला होता. एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यनं विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले होते. रोहित आर्यची स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड झाली होती. शासनाकडून रितसर परवानगी दिली होती. परंतु, मधल्या काळात आर्यानं विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले होते. ते पैसे परत न दिल्याने त्याचे बिल थांबवण्यात आले. मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.

तसेच आपण त्या खात्याचा मंत्री नाही, पण जर मी मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. मी पूर्वी त्याला धनादेश देऊन मदत केली होती. मात्र, चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही," असा गौप्यस्फोट माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. त्यांनी रोहितने सरकारच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. त्यापोटी त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे दिले, आपण स्वतः चेकने पैसे दिल्याचा दावा केसरकर यांनी केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.