धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खोटं
हेमा मालिनी, ईशा देवोल अफवांवर भडकल्या
मुंबई : खरा पंचनामा
बॉलिवूडचा ही मॅन अर्थात धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी सोमवारी रात्रीपासून व्हायरल होत आहे. सोमवारी सकाळीही धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर शोककळा पसरली होती.
प्रत्येकजण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती. पण धर्मेंद्र यांच्या निधन आणि प्रकृतीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. दरम्यान धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने इन्स्टावर पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे.
सोमवारी अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी अचानक सोशल मीडिया आणि अनेक वृत्त माध्यमांनी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या. हिंदी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांनी, राजकीय नेत्यांनीही यावर शोक व्यक्त केला. मात्र, त्यानंतर काहीवेळातच धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.
माध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या कुटुंबाची प्रायव्हेसी जपावी. वडिलांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद.
हेमा मालिनी यांनी म्हटले आहे की, जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्सने खोट्या आणि चुकीच्या बातम्या देऊ नये. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.