बोपोडीतील जागा माझीच, मी विकलेली नाही
हेमंत गावंडेंच्या दाव्याने खळबळ
पुणे : खरा पंचनामा
"बोपोडीतील सीटीएस नं. ३ व ४, प्लॉट नं. १४ (सर्व्हे नं. ६२) ही आठ एकर जागा मी विद्ध्वंस यांच्याकडून विकत घेतली आहे. त्या जागेवर बस टर्मिनसचे आरक्षण असून, अमेडिया कंपनीला मी ही जागा विकलेलीच नाही.
तरीही या प्रकरणात माझी चौकशी न करता गुन्हा दाखल केला आहे," असा दावा बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आणि महसूल विभागाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
बोपोडीतील ही जमीन पेशवे काळापासून विद्धंस यांच्याकडे होती. यासंदर्भात मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. १९३० पासून या जागेचा सातबारा विद्ध्वंस यांच्या नावावर आहे. कृषी महाविद्यालय या जागेवर भाडेकरू आहे, जागामालक नाही. २००९ मध्ये आठ एकर जागा मी विद्ध्वंस यांच्याकडून विकत घेतली आहे.
या जागेवर बस टर्मिनसचे आरक्षण आहे. त्यामुळे ती ताब्यात द्यावी, असे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यासाठी २० कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार होता. रोख रकमेऐवजी टीडीआर घेण्यासाठी अर्ज केला होता; पण तो अर्ज आम्ही मागे घेतला आहे, असे गावंडे यांनी सांगितले. ही जागा आजही माझीच आहे. ती अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांना कोणालाही विकलेली नाही. पोलिसांनी चौकशी न करता थेट माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे गावंडे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.