सांगलीत तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक
अवघ्या बारा तासात विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील काळ्या खणीजवळील घोड्याच्या तबेल्यात मित्राचाच निर्घृण खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर अवघ्या बारा तासात विश्रामबाग पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.
मलिक उर्फ मलक्या दस्गीर मुलाणी (वय 28, रा. वखारभाग, सांगली), निशाद भिमसेन दासूद (वय 20, रा. काळीखण जवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमीर रावसाहेब कन्नुरे वय 33, रा. हनुमाननगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. अश्लील शिवीगाळ केल्याच्या कारणातून खून केल्याची त्यांनी कबुली दिली. मयत अमीर कन्नुरे आणि संशयित मलिक उर्फ मलक्या, निशाद हे तिघे मित्र आहेत. तिघांना दारूचे व्यवसन आहे. शनिवारी रात्री तिघे एकत्र जमले होते. त्यावेळी चेष्टामस्करीमधून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन शिवीगाळ, दमदाटीमध्ये झाले होते. त्यावेळी मयत अमीर याने दोघांना अश्लील शिवीगाळ केली होती. या रागातून त्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले होते.
अमीर हा हनुमाननगर येथील राहणारा असून तो काळीखण येथील एका तबेल्यात कामास आहे. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दोघे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसले होते. रविवारी रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्यात झोपी गेला. परंतु त्याचा एक साथीदार त्याच्या अन्य मित्रांसह त्या ठिकाणी बसला होता. तो साथीदार लघुशंका करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर दोघांनी अमीर याच्यावर झोपेतच तोंडावर एडक्याने सपासप 7 वार केले. नंतर दोघे तेथून पळून गेले. ही बाब अमीरच्या साथीदाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने अन्य मित्रांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा पूर्वीचा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रविण कांचन, दादासाहेब मगदुम, दिनेश माने, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, योगेश पाटील, पंढरीनाथ भांगरे, चंद्रकांत माने, उमेश कोळेकर, श्रीधर फुके, सोहेल कार्तीयानी, सुनिल पाटील यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.