रील बनवण्यासाठी तलवार बाळगणारा अल्पवयीन ताब्यात
मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सोशल मीडियावर घातक हत्यार घेऊन दहशत माजवण्यासाठी रील बनवायला धारदार तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
सोशल मीडियावर घातक हत्यारे घेऊन दहशत बनवण्यासाठी रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक शोध घेत असताना एक युवक मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या विनापरवाना तलवार हत्यार घेवुन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे जाऊन अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले त्याच्याकडील धारदार तलवार जप्त करण्यात आली. मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिप गुरव, कलगुटकर श्रेणी उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे, नानासाहेब चंदनशिवे, राहुल क्षिरसागर, बसवराज कुंदगोळ, अमोल तोडकर यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.