Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी

तुळजापूर : खरा पंचनामा

पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ज्याच्यावर आरोप केले त्यालाच पक्षात घेतल्यानं विरोधकांच्या टीकेचा सामना भाजपला करावा लागला होता. शेवटी प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपने घेतला.

दरम्यान, आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या विनोद गंगणे यालाच भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलंय. आता या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दुसीरकेड भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरण समोर आणण्यासाठी विनोद गंगणे याची मदत झाल्याचा दावा केलाय.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी विनोद गंगणे हा आरोपी आहे. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. ड्रग्ज प्रकरणी विनोद गंगणेला तुरुंगातही पाठवण्यात आलं होतं. त्याच विनोद गंगणेला भाजपनं थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलीय. याआधी भाजपने याच प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या संतोष परमेश्वर यालाही पक्षात घेतलं होतं. संतोष परमेश्वर हा माजी नगराध्यक्ष होता. त्याच्या प्रवेशानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका झाली होती.

भाजपकडून आरोपींना पाठीशी घातलं जातंय आणि भाजप तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं.

भाजपने विनोद गंगणेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ड्रग्ज प्रकरणातला आरोपी लोकप्रतिनिधी होणार का? असा सवाल करत महायुती सरकारची वॉशिंग मशीन कमाल करतेय. आधी भ्रष्ट लोकांना पवित्र करायची आणि आता ड्रग्ज प्रकरणी तीन महिने तुरुंगात गेलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जातेय. गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे असंही वडेट्टीवार यांनी विचारलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.