भाजपाच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना ठोकलं!
ठाणे : खरा पंचनामा
एकीकडे राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध उमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे असे वाद आणि नाराजीनाट्य सुरू असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सदर प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करुन घेतली आहे. काल (20 नोव्हेंबर) रात्री उशिरा पोलिसांस सदर प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख आणि महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
काल (20 नोव्हेंबर) बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे करण्यात असल्याने शिवसैनिक बीएसयूपी इमारतीत जाऊन सेलिब्रेशन करत होते. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन करण्यात येणार होते. मात्र त्याठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकाने येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांन कसे सेलिब्रेशन करता? असे विचारात भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात नारायण पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप हा व ठाण्यातील वाद आणखी चिघळणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.