न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली : खरा पंचनामा
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती कांत यांना शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल या समारंभात उपस्थित होते.
विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा कार्यकाळ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी संपला. आता देशाचे ५३ वे सरन्यायाधीश ठरेल्या सूर्य कांत यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असणार आहे. शपथविधीनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती भवनात उपस्थित असलेल्या इतरांची भेट घेतली. तसेच माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना आलिंगन मारली. आई-वडिलांचे चरण स्पर्श करत आर्शीवाद घेतले.
ब्राझीलसह सात देशांतील मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या समारंभाला उपस्थित होते. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यायिक शिष्टमंडळाने सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेतील मुख्य न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय देखील या समारंभाला उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.