Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

मुंबई : खरा पंचनामा

गौरी पालवे - गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर वरळी पोलिसांसमोर रविवारी रात्री १ वाजता अनंत गर्जे यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. अनंत गर्जे यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी पोलीस न्यायालयात नेमकी काय माहिती देतात हे महत्वाचं आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी अनंत गर्जे यांच्या वकिलांकडून जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद होणार.

वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे यांनी दिनांक २४ रोजी मध्यरात्री वरळी पोलीस स्थानकात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी अनंत गर्जे स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.