केईएम रुग्णालयाला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य गौरव पुरस्कार’…
यशाचे खरे शिल्पकार मंत्री आशिष शेलार आणि विकास देशमुख यांचे दूरदर्शी मॉडेल
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाला यंदाचा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे मुंबईतील सर्वोत्कृष्ट व यशस्वी अंमलबजावणी करणारे रुग्णालय म्हणून केईएमला हा बहुमान मिळाला आहे. या यशामागे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची दूरदृष्टी आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे विकास देशमुख यांनी विकसित केलेले ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट मॉडेल’ हे खरे शिल्पकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१२ ते २०१७ या काळात मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सरकारी आरोग्य योजनांचे क्लेम भरले जाताना प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिकचे क्लेम रिजेक्ट झाले होते. यातून महानगरपालिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले, तर गरीब रुग्णांना मोफत उपचारापासून वंचित राहावे लागले. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी २०१५ पासून पुढाकार घेतला. त्यांनी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे विकास देशमुख यांनी तयार केलेल्या ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट’ या संकल्पनेवर विश्वास ठेवला. सलग चार वर्षे देशमुख हे मॉडेल महानगरपालिका अधिकाऱ्यांना समजावून सांगत होते; पण त्यावेळी त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर मंत्री शेलार यांनी उपायुक्त,आयुक्त यांच्यासोबत स्वतः बैठक घेऊन श्री. देशमुख यांना सादरीकरण करण्याची संधी मिळवून दिली. मंत्री शेलार यांनी हा विषय लावून धरला आणि अखेर २०१६ मध्ये पहिले टेंडर काढले गेले.
१ जानेवारी २०१८ पासून क्रिएटिव्ह सोल्युशन्सने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये हे मॉडेल राबवायला सुरुवात केली. परिणामी सर्व रुग्णालयांमध्ये १०० टक्के रुग्ण कव्हरेज, दरवर्षी सरासरी ८४ कोटी रुपयांचे क्लेम यशस्वीपणे सेटल झाले. २०१८ ते २०२५ या काळात महानगरपालिकेला दुप्पट महसूल प्राप्त झाला. एकही रुग्ण, नातेवाईक किंवा अधिकाऱ्याकडून कंपनीविरोधात तक्रार आली नाही.
मंत्री आशिष शेलार यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे आणि विकास देशमुख यांच्या क्रिएटिव्ह सोल्युशन्सच्या परफॉर्मन्स आधारित मॉडेलमुळे आज मुंबईतील लाखो गरिबू रुग्णांना कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार मिळत आहेत. राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार केईएम रुग्णालयाला मिळाला, तरी या यशाचे खरे श्रेय मंत्री आशिष शेलार यांच्या दूरदृष्टीला आणि विकास देशमुख यांच्या सर्जनशील उपक्रमाला आहे.“गरिबाचा जीव वाचवणे हीच खरी भारतीय जनता पक्षाची सेवा आहे,” असे मत मंत्री आशिष शेलार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. हा पुरस्कार म्हणजे केवळ केईएमचा नाही, तर मुंबईतील प्रत्येक गरिबू रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधानाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विकास देशमुख हे आरोग्य क्षेत्रात राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे अनुभवी सामाजिक उद्योजक आणि समाजमान्य प्रशासकीय धोरण तज्ज्ञ आहेत. गेल्या १३ वर्षांत त्यांनी सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये प्री-ऑथरायझेशन, क्लेम मॅनेजमेंट आणि रुग्णसेवा सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो रुग्णांना सुलभ, वेळेवर आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. डिजिटल हेल्थ सिस्टिम्स, वेब पोर्टल प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधारित क्लेम सेटलमेंटमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य असून, आरोग्य योजनांना अधिक पारदर्शक, जलद आणि कार्यक्षम बनवण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.