कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान : ना. चंद्रकांत पाटील
पुणे : खरा पंचनामा
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडकरांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे 1 लाख 12 हजार 41 इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले . आज त्या जनविश्वासाच्या वर्षपूर्तीचा दिवस! यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आज आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करत कोथरुडकरांचे आभार मानले. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले, तुम्ही मला दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेला हा विश्वास असाच अढळ राहो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
पाटील पुढे म्हणाले, तुमच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून विकसित कोथरूड हे आपलं सामूहिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सतत, निश्चयाने आणि समर्पणाने कार्यरत आहे. कोथरूडकरांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा मी आजन्म ऋणी राहीन. तुमच्या मायेने, पाठिंब्याने मला अधिक बळ मिळत आहे.
कोथरूडच्या प्रगतीचा हा प्रवास तुमच्या विश्वासानेच शक्य झाला आहे. यासाठी कोथरूडच्या मायबाप जनतेला पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.