खून प्रकरणातील संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक
देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतूस, कोयता जप्त : मिरज शहर पोलिसांची कारवाई
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत झालेल्या निखील कलगुटगी याच्या खुनातील मुख्य सूत्रधार सलीम पठाण याच्यावर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन काडतूसे भरलेले देशी बनावटीचे पिस्तूल, कोयता जप्त करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अन्य दोन संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंश दिनकर बाली (वय २०, रा. दत्तनगर, पवनचक्कीजवळ, मालगांव रोड, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिरजेत पूर्व वैमनस्य आणि गोळीबाराच्या कारणातून निखील कलगुटगी याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य सूत्रधार असणारा सलीम पठाण याच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सलीम पठाण याला बुधवारी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वंश बाली याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य संशयित घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय पुजारी, आण्णासाहेब गादेकर, भैरवनाथ पाटील, निलेश कदम, सचिन सनदी, राजेश गवळी, प्रविण वाघमोडे, विनायक ऐवळे, स्वप्निल नायकोडे, अजित अस्वले यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.