बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब'
ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर २२ मतदार कार्ड
नवी दिल्ली : खरा पंचनामा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या गंभीर आरोपांसह "एच फाइल्स" नावाची पत्रकार परिषद घेतली. ही परिषद बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदानाच्या काही दिवस आधीच आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून या परिषदेला "हायड्रोजन बॉम्ब लोडिंग" असे संबोधण्यात आले होते.
इंदिरा भवन येथे झालेल्या या परिषदेची सुरुवात गुरु नानक देव यांच्या स्मरणाने झाली. राहुल गांधी म्हणाले, "हे फक्त एका मतदारसंघाचे प्रकरण नाही. अनेक राज्यांमध्ये मतांची चोरी होत आहे." हरियाणा निवडणुकीत पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतदानाच्या निकालात फरक पडला. पोस्टल बॅलेटनुसार काँग्रेसला ७६, तर भाजपला केवळ १७ जागा मिळाल्या. नेहमी दोन्हींची दिशा एकच असते.
ते पुढे म्हणाले, "हरियाणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मतचोरी उघडकीस आली. सुरुवातीला मला खात्री नव्हती, पण चौकशीत सत्य समोर आले. राज्यपालांनी याची चौकशी करावी. संपूर्ण राज्याचा जनादेश चोरीला गेला आहे."
राहुल गांधींनी ठामपणे सांगितले, "मी १०१ टक्के सत्य बोलतोय. हे सर्व पुराव्यांसह सांगतोय. एक्झिट पोल्समध्ये काँग्रेस आघाडीवर होती. अनेक राज्यांतून मतचोरीच्या तक्रारी आल्या."
त्यांनी आरोप केला की, ही चोरी बूथ पातळीवर नाही, तर केंद्रीकृत पद्धतीने होते. हरियाणाच्या मतदार यादीत ५.२१ लाख डुप्लिकेट नावे होती. एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर २२ मतदार कार्ड सापडले. काँग्रेसचा पराभव फक्त २२ हजार मतांनी झाला, पण विजय पराभवात बदलण्यासाठी मतचोरी झाली.
"एकाच मुलीचे २२ मतदार कार्ड, १० केंद्रांवर मतदान, २५ लाख मते चोरीला - हे सर्व पुरावे आहेत," असे ते म्हणाले. फॉर्म ६ आणि ७ च्या माध्यमातून ही चोरी झाली. उत्तर प्रदेशातही भाजप नेत्यांच्या घरी अशी मते नोंदवली गेली.
राहुल गांधींनी सांगितले, "आठपैकी एक मतदार बनावट होता. एका महिलेने नऊ ठिकाणी मतदान केले. मतदानानंतर निवडणूक आयोगाने डुप्लिकेट मते सॉफ्टवेअरमधून हटवली. १.२४ लाख मतदारांच्या बनावट फोटो, दोन बूथवर एकच फोटो २२३ वेळा - हे सर्व पुरावे आहेत. सीसीटिव्ही फुटेज डिलिट केले गेले."
ते पुढे म्हणाले, "घर क्रमांक ८ मध्ये ५००, क्रमांक ५०१ मध्ये ६६ मतदार. ९३ हजार १७४ पत्ते चुकीचे. ३.५ लाख नावे मतदार यादीतून काढली. घर क्रमांक ० चे मतदारही संशयास्पद. हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीने झाले."
बिहारमध्येही अशीच चोरी सुरू आहे. एका गावातून १८७ नावे काढली. राहुल गांधींनी एका मतदाराला स्टेजवर बोलावले. "एकाच पत्त्यावर ६०-१०८ मते, भाजप नेत्यांच्या घरी ६० मते -हे लोकशाहीचे अपहरण आहे," असे ते म्हणाले. "एका मुलाच्या फोटोवर वृद्धाचे वय, पुरुषाच्या नावावर महिलेचा फोटो, असे ६५ लाख नावे काढली गेली. हरियाणानंतर बिहारची पाळी आहे. ही मतचोरी थांबली पाहिजे," असे राहुल गांधी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.