'तुम्ही दिलेल्या रक्कमेत CP, DCP यांना मॅनेज करु' म्हणणाऱ्या पीएसआयला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पिंपरी-चिंचवड : खरा पंचनामा
पिंपरी पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईची देशपातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली आहे.
त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचे बघुन घेऊ. सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला २ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना सापळा कारवाईत पकडण्यात आले.
४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी अगोदर चिंतामणी याने २ लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये केली. तसेच तक्रारदार वकील यांना संदिप सावंत व चिंतामणी यांनी त्यांच्या केबिनमध्ये अरेरावीची भाषा केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.