भाजपाच्या मुंबईतील यादीत 10% गुजराती, त्याहून जास्त उत्तर भारतीय
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी होईल असा अंदाज बांधला जात आहे. मुंबईवर दोन गुजरात्यांचा डोळा असल्याचं विधान रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यामध्ये केलं. खरं तर सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये स्थानिक मराठी विरुद्ध गुजराती किंवा उत्तर भारतीय असा सुप्त संघर्ष आरोप-प्रत्यारोपांमधून पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीचा मुद्दा मुंबईच्या निवडणुकीत प्रतिष्ठेचा बनवला आहे. युती करतानाही आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, असं ठाकरे बंधुंनी सांगितलं. मात्र भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीकडे पाहिल्यानंतर भाजपाने पाहिल्याच यादीतून ठाकरे मराठीचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. भाजपा मराठीविरोधी आहे असं चित्र उभं करण्याचा ठाकरे बंधूंच्या दाव्याला भाजपाने उमेदवार यादीमधून उत्तर दिलं आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत 67 उमेदवार आहेत.
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मनसेमुळे काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली. या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांचा मुद्दाही महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळेच भाजपा किती उत्तर भारतीय उमेदवारांना संधी देते हे महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या यादीतील 67 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत.
भारतीय जनता पार्टी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीमधील जवळपास 10 टक्के उमेदवार हे गुजराती आहेत. भाजपाने 67 पैकी 6 उमेदवार हे गुजराती दिले आहेत. गुजराती उमेदवारांमध्ये माजी आमदार किरीट सोमय्या यांच्या मुलासहीत अन्य पाच जणांचा समावेश आहे. भाजपाच्या पहिल्या यादीमधील 67 उमेदवारांपैकी तब्बल 48 उमेदवार हे मराठी आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.