ताकारी येथील सराफी दुकान फोडणाऱ्या चौघांना अटक : सांगलीतील तीन तर कोल्हापुरातील एकाचा समावेश
10.30 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
ताकारी येथील सराफी दुकानाची भिंत फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. एक संशयित पसार झाला आहे. त्यांच्याकडून 10.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
प्रदीप हणमंत थोरात (वय ३६, रा. मळी भाग, बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गणेश ऊर्फ अजित शांताराम मागनगिरी (वय ३०, रा. सांगोले, ता. खानापूर, जि. सांगली), सुरेश गंगाराम कोळी (वय २५, रा. गंजी माळ, संभाजीनगर, कोल्हापूर ता. करवीर, जि. कोल्हापूर), आकाश अंकुश सावंत (वय ३०, रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजकुमार भरत मच्छवे (रा. दरफळ, जि. धाराशिव) असे पसार झालेल्याचे नाव आहे. दि. 12 डिसेंबर रोजी वाळवा तालुक्यातील ताकारी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लंपास करण्यात आल्याचे दि. 13 रोजी निदर्शनास आले. यातील चोरट्याना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना चौघेजण दोन दुचाकीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ताकारी येथील सराफी दुकान फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून १९.०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०३ किलो ४४० ग्रॅम वजनाची निरनिराळया प्रकारांचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, दोन मोटार सायकल असा एकूण 10.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सायबरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सायबरच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, संदीप पाटील, संदीप गुरव, अतुल माने, अरुण पाटील, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश पाटील, उदयसिंह माळी, रणजीत जाधव, सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, शिवाजी शिद, प्रतीक्षा गुरव, अभिजीत माळकर, सुरज थोरात, विनायक सुतार, पवन सदामते, संकेत कानडे सायबर पोलीस ठाणेकडील करण परदेशी, अभिजीत पाटील, अजय पाटील ईश्वरपूर पोलीस ठाणे कडील दिपक घस्ते, विशाल पांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.