Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

व्हिजन, कामाची आवड नेतृत्वाला हवीजातीपातीचे राजकारण करून पोळी भाजायला मी आलो नाही : अजित पवारांचा जयंतरावांना टोलामिरजमध्ये अनेकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

व्हिजन, कामाची आवड नेतृत्वाला हवी
जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजायला मी आलो नाही : अजित पवारांचा जयंतरावांना टोला
मिरजमध्ये अनेकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

मिरज : खरा पंचनामा

मला कामाचा उत्साह आहे. मताचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी येथे आलो नाही. माणुसकी महत्वाचे असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार केले. नेतृत्वाला व्हिजन असले पाहिजे,  कामाची आवड असली पाहिजे असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश  मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी,आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान, श्रीमती रेखा विवेक कांबळे, बिलकिस बुजरूक शेख, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे यांच्यासहित अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी अजितदादा म्हणाले, मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यासाठी 153 कोटी रुपयाचा निधी हा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत खूप मोठे नेते सांगलीने दिले. आता नवीन नेतृत्व समोर येतेय ज्याला ताकद देण्याचं काम मी करतोय. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना बद्दल खुप बोलले जातेय. मी ग्रामीण भागातील माणूस आहे. पैशाचे सोंग करता येत नाही, सामान्य माणूस, गरीब लोकांना पैसे देण्याचा माझा प्रयत्न असतो. बरेच काम सांगली,मिरज, कुपवाड महापालिका मध्ये करण्याची गरज आहे.  मुंबई, पुणे सोडता बाकी महापालिकाना केंद्राचा निधी बाहेरून निधी आणला गेला पाहिजे

बीड मध्ये विमानतळ काम सुरू करतोय. विकास करताना जमीन लागत असते. शक्तीपीठमध्ये काहीसा बदल करतोय काही, तुम्हाला विश्वस्त घेऊन हा हायवे होईल. या शक्तीपीठसाठी प्रसंगी चारपट रकमम देऊ. सांगलीत विमानतळाचा प्रश्न पेंडीग आहे. राज्यस्तरीय कला अकादमी उभारू. मराठी माणसाच्या अंगात कर्तृत्व पण संधीची गरज आहे. एआय चा वापर केला पाहिजे, पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे. ए आयचा वापर न करता येणारी अशिक्षित असतील. अर्थमंत्री पद माझ्याकडे, अल्पसंख्याक, क्रीडा कालच माझ्याकडे आलेय. निधी वाचून काम थांबवलंय अशी परिस्थिती येऊ देणार नाही. माझ्याकडे अनुभव आहे. मी शब्दाचा पक्का आहे. आज प्रवेश केलेल्यावर आगीतून उठला आणि फुफुट्यात पडला अशी वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सत्ता येते जाते, मी ताम्रपट घेऊन आलो नाही. कामाचा दर्जा चांगला, हवा. ब्रिटिशनी केलेली कामे पहा, 100 वर्ष होत आले तरी आयर्विन पूल उभा आहे. आपल्या काळातील पूल का 100 वर्ष टिकत नाही, का लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही? हे पहावे लागेल. नव्या जुन्याची मोट बांधून ज्याच्यात मेरिट आहे त्यांना संधी देण्याचे काम करू असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.