Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमध्ये तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून पूर्व वैमनस्यातून कृत्य : चारही संशयित संजयनगर पोलीस ठाण्यात हजर

कुपवाडमध्ये तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून 
पूर्व वैमनस्यातून कृत्य : चारही संशयित संजयनगर पोलीस ठाण्यात हजर 

सांगली : खरा पंचनामा 

कुपवाडमधील अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर एका तरुणाचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. घटनेनंतर चारही संशयित स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाटगे यांनी सांगितले.
मयत विनायक उर्फ राहुल सुनील कदम (रा अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. तर सारंग देवदास आवळे (वय 18, रा. माधवनगर बस स्टॅन्ड), निखिल अनिल यादव (वय 21 चिंतामणी नगर, सांगली), रमेश मुकेश जाधव (वय 19, रा. अहिल्यानगर), विनायक सूर्यवंशी (रा. अहिल्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत.
आठ दिवसापूर्वी मृत विनायक कदम आणि संशयितामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी विनायक अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर थांबला होता. त्यावेळी संशयित तेथे आले. जुन्या भांडणाचा जाब विचारत त्यांनी विनायक याच्यावर कोयत्याने हल्ला केला. डोक्यात आणि चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने तो तेथेच कोसळला. त्याला तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.