भाजपाचे 13 नगरसेवक निवडून येण्याआधीच अपात्र?
नवी मुंबई : खरा पंचनामा
भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत कलहामुळे निवडणूक लढवण्याच्या आधीच 13 संभाव्य नगरसेवकांचा पत्ता कट होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे यामध्ये दोन बड्या नेत्यांमधील वादाचा संदर्भअसून या वादाच्या नादात पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतरही उमेदवारांना तो भरता आलेला नाही. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ बाकी असल्याने शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाल्याने तो भरुन सादर करण्यासाठी उमेदवारांची तारांबळ उडली आहे. मात्र या प्रकरणात एबी फॉर्मवरील एक स्वाक्षरी राहिल्याने त्या फॉर्मला या स्वाक्षऱ्यांशिवाय रद्दीच्या कागदाएवढं मुल्य शिल्लक राहिल्याने 13 उमेदवार निवडणूकच लढवू शकणार नाहीत की काय अशी चर्चा आहे.
हा सारा गोंधळ नवी मुंबईमध्ये घडला आहे. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील अंतर्गत वाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईमध्ये भाजप स्वबळावर लढवत आहे. भाजपकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांपैकी 13 जणांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. मात्र या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांनी स्वाक्षरीच केली नसल्याने हे फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही एक स्वाक्षरी नसल्याने उमेदवार चांगलेच संतापले आहेत. आता फॉर्म घेऊन जा नंतर सही करतो असं जिल्हाध्यक्षांनी आश्वासन दिले होते. परंतु फॉर्म भरायला काही तास शिल्लक असताना देखील स्वाक्षरी करण्यात आलेली नाही.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आजच या फॉर्मसहीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. तसं झालं तरच उमेदवार निवडणूक लढवू शकतात. जिल्हाध्यक्ष संपर्कात नाहीत. या साऱ्या प्रकारानंतर मंदा म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. फक्त चार जागा आम्हाला देत आहेत त्या जागा देखील आम्हाला नको असल्याचं ते म्हणालेत. गणेश नाईक यांनी आता 111 जागा स्वतः लढवून जिंकून दाखवाव्यात असे आवाहन मंदा म्हात्रे यांनी दिले आहे.
भाजपमध्ये आम्ही अनेक वर्षे काम करत असून एबी फॉर्मवर सही न देता आमची फसवणूक भाजपने केली असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी नोंदवली आहे. सुहासीन नायडू, पांडुरंग आमले या उच्छूक उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. दरम्यान या वादात, गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि नवी मुंबई निवडणूक प्रभारी संजीव नाईक यांनी, "मंदा म्हात्रे यांच्या बाबतीत गैरसमज झाला आहे. आम्ही याबाबत जिल्हादयक्षांशी बोलत असून गैरसमज दूर करू," असं म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.