Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंध्रप्रदेशमधील दोघांना अटक सांगली, कोल्हापूर, अकोला, नांदेड येथील 8 गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंध्रप्रदेशमधील दोघांना अटक 
सांगली, कोल्हापूर, अकोला, नांदेड येथील 8 गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंध्रप्रदेश येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सांगली, कोल्हापूर, अकोला, नांदेड येथील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.

सालमान रामलू गुड्डेटी (वय ५६), संदीप सलमान गुड्डेटी (वय ३२, रा. तिप्पा, बिटरगुन्टा जि. नेल्लोर, आंध्रप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील बॅग लिफ्टिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना हवालदार सागर लवटे यांना ही चोरी सालमान गुड्डेट्टी याच्या आंतरराज्य टोळीने शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅग लिफ्टिंग केली असून त्यातील दोघे मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने त्या परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी सांगली, कोल्हापूर, अकोला, नांदेड जिल्ह्यातील आठ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांना शिराळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथे विविध गुन्हे दाखल आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सपना गराडे, सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, सतिश माने, संदीप गुरव,  मच्छिद्र बर्डे, पोना संदिप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत, केरबा चव्हाण, सुनिता शेजाळे, दुर्गा टेकाम, शिराळा पोलीस ठाण्याकडील अमर जाधव, उमेश शेटे, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.