Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. गुंड निलेश घायवळ टोळीनेही कोथरुड भागात अनेक गुन्हे केले आहेत. अशातच आता निलेश घायवळला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बनावट कागदपत्र काढून त्याद्वारे पारपत्र मिळवून लंडनला गेलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांना हा निकाल दिला आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गोळीबार प्रकरणात घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. परदेशात गेलेल्या घायवळने ९० दिवसांचा व्हिस्सा मिळवला आहे. याबाबत ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून, घायवळ व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी घायवळला फरार घोषित करण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्याने आता त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल.

घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला 'लूक आउट नोटीस बजाविली होती. त्यानंतर 'रेड कॉर्नर' नोटीस बजाविण्यात आली होती. तर नुकतीच पुणे पोलिसांनी 'ब्लू कॉर्नर' नोटीस देखील बजावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.