अवैध धंदेवाल्यांशी संगनमत; गुन्हे शाखेचे दोन हवालदार तडकाफडकी निलंबित
पुणे : खरा पंचनामा
मटका जुगाराशी निगडित चालविणाऱ्या व्यक्तींशी संपर्क ठेवणाऱ्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकातील दोन पोलीस हवालदारांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई व अभिनव बापुराव लडकत अशी निलंबित केलेल्या दोन हवालदारांची नावे आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी समर्थ पोलिसांनी नागेश्वर मंदिराजवळून औदुंबर अर्जुन सोनावणे (65) याला जुगार घेताना पकडले. तपासात सोनावणे हा सोमवार पेठेतील बाळा ऊर्फ प्रविण चव्हाण यांच्या निर्देशानुसार मटका घेत असल्याचे स्पष्ट झाले. बाळा चव्हाणला 11 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याच्या मोबाईलचे विश्लेषण करण्यात आले.
यात दोन्ही पोलीस हवालदारांचे नियमित फोन संपर्क आढळून आले. विशेषतः हवालदार शुभम देसाई यांनी आरोपीशी नियमित कॉल केले असल्याचे आढळले. दोन्ही हवालदारांना यापूर्वी अवैध धंदेवाल्यांपासून दूर राहण्याच्या, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध ठेऊ नयेतअशा स्पष्ट सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या.
तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा दिसून आली नाही. उलट त्यांचा आरोपीशी संपर्क कायम असल्याचे तपासात समोर आले. दोन्ही हवालदारांनी कर्तव्यावरील बेफिकिरी, पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन, आणि नैतिक अधःपतन अशा कृतींमुळे पोलीस दलाचा विश्वास डळमळीत करण्याचे काम केल्याचे वरिष्ठांचे निरीक्षण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डीसीपी निखिल पिंगळे यांनी दोन्ही हवालदारांना ताबडतोब निलंबित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.